✦ त्यांच्या प्रेरणेने स्थापन झालेली ही संस्था — मथुरा प्रतिष्ठान
स्थापनेचे उद्दिष्ट
मथुरा प्रतिष्ठान — स्थापनेची पार्श्वभूमी
कै. मथुराबाई पिता तात्याबा जाधव यांचा जन्म २८/११/१९२३ रोजी झाला. लहानपणीच वडिलांचे छत्र हरपले. बालवयात विवाह झाला आणि नियतीने अवघ्या ९ वर्षांतच त्यांच्यावर पतीवियोगाचे दुःख ओढवले. त्यानंतर त्यांनी ४ थीपर्यंत शिक्षण पूर्ण करून शिक्षिका म्हणून नोकरी पत्करली व सन् १९८१ मध्ये मुख्याध्यापिका म्हणून सेवानिवृत्त झाल्या.
स्वतःचे निवृत्ती वेतन व इतर जमापुंजीतून नळदुर्ग येथील व्यासनगर येथे श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिराची उभारणी त्यांनी स्वतः केली. त्याच प्रेरणेतून सामाजिक व शैक्षणिक कार्यासाठी "मथुरा प्रतिष्ठान" ची स्थापना झाली.
🎯ट्रस्टची उद्दिष्टे
१कान्हा बाल उद्यान उभारणी (दि. ७-७-२००७)
२फळबाग वृक्षारोपण स.नं. २६३ —
३अंध-अपंग-मूक-बधीर दिव्यांग शाळेत शैक्षणिक साहित्य वाटप
४आनंदघर '' — भूमिपूजन ते शाळा | ई-लर्निंग | एक मूल एक वृक्ष
५जन्मशताब्दी निमित्त सोहळा — मूर्ती पूजन व अभिषेक
६अंतरंग ज्येष्ठांसाठी '' — वृद्ध सेवा केंद्र (विरंगुळा)
दि. ७-७-२००७ रोजी स्थापित बाल उद्यान. मुलांसाठी आनंदमय वातावरण निर्माण.
🏫
आनंदघर
३ ते ९ वर्ष वयोगटासाठी रचनावादी बालशिक्षण केंद्र. ई-लर्निंग सुविधा उपलब्ध.
🧓
अंतरंग वृद्ध सेवा
सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकांसाठी विरंगुळा केंद्र. विश्रांती व आरोग्य सेवा.
🌳
फळबाग वृक्षारोपण
स.नं. २६३ मधील फळबाग. पर्यावरण संवर्धनासाठी वृक्षारोपण अभियान.
📦
दिव्यांग सेवा
अंध-अपंग-मूक-बधीर विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप. सर्वांगीण विकास.
🙏
जन्मशताब्दी सोहळा
२०२३ मध्ये कै. मथुराबाई यांची जन्मशताब्दी. मूर्ती पूजन व दुग्धाभिषेक सोहळा.
फोटो गॅलरी
क्षणचित्रे
आमच्या उपक्रमांचे काही निवडक क्षण
🎡
कान्हा बाल उद्यान, नळदुर्ग येथील दानशूर ह.भ.प. जगन्नाथ रायप्पा जाधव यांनी आपल्या वडिलोपार्जित जमिनीपैकी २ हेक्टर २ आर जमीन कैलासवासी मथुराबाई तात्याराव जाधव यांच्या स्मरणार्थ स्थापन करण्यात आलेल्या मथुरा प्रतिष्ठानसाठी दानपत्राद्वारे दिली आहे. या माळरानावर संस्थेने सर्वप्रथम लहान मुलांचा विचार करून त्यांच्यासाठी खेळण्याची व बागडण्याची उत्तम सुविधा निर्माण केली. नळदुर्ग परिसरात मुलांसाठी गार्डनची सुविधा उपलब्ध नसल्याने, संस्थेने हैदराबाद येथून झोके, घसरगुंडी, मेरी-गो-राऊंड, सी-सॉ तसेच मुलांची उंची व शारीरिक विकास वाढविण्यास उपयुक्त विविध खेळणी आणून बसवली आहेत. या उद्यानात लहान मुले आनंदाने खेळण्यासाठी येतात तसेच पालकही आपल्या मुलांना येथे घेऊन येतात. विशेष म्हणजे, या सर्व सुविधांचा लाभ घेण्यासाठी मथुरा प्रतिष्ठानतर्फे पूर्णपणे मोफत प्रवेश देण्यात येतो.
दि. ७-७-२००७ | नळदुर्ग
🌳
सीताबाग फळबाग लागवड
उजाड दगड धोंडे कुसळाच्या भागात जिथे गवताशिवाय काहीच येत नसल्याने संस्थेला दानपत्राआधारे मिळालेल्या 2 हेक्टर 02 आर जमिनीवर धाडसाने बोअरवेल घेऊन कमी पाण्यातही फळबागेची म्हणजेच आंबा , आवळा , चिंच , लिंबू , चिक्कू यांच्या रोपांची यशस्वी लागवड करून त्याला जागवण्याचा प्रयत्न करून तो यशस्वी केला.
आजघडीला जवळपास कडुलिंब , चंदन , सीताफळ , बोर , शेवगा , नारळ , जांभूळ यासह 268 झाडे दिमाखात उभी आहेत. विशेष म्हणजे या जमिनीत वाळवी असल्याने या झाडांना सांभाळणे खूप अवघड आहे शेवटी प्रयन्तांती परमेश्वरावर श्रद्धा ठेवणे
फळबाग वृक्षारोपण
फळबाग वृक्षारोपण
फळबाग वृक्षारोपण
📦
शैक्षणिक साहित्य वाटप व गरजूंना मदत- मथुरा प्रतिष्ठानतर्फे शाळेतील अंध, अपंग, मूक-बधिर तसेच गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याचे नियमित वाटप केले जाते. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी संस्था सातत्याने सहाय्य करत राहणार आहे. संस्थेच्या वतीने आवाहन करण्यात आले आहे की, गरजू व आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांनी केव्हाही संस्थेशी संपर्क साधून त्यांना आवश्यक असलेले शैक्षणिक साहित्य घेऊन जावे. शाळेतील विद्यार्थ्यांना गणवेश, स्कूल बॅग, पाटी, पेन, पेन्सिल, वह्या तसेच इतर आवश्यक शैक्षणिक साहित्याचे नियमित वाटप केले जाते. विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे आणि त्यांना प्रोत्साहन देणे हा संस्थेचा प्रमुख उद्देश आहे.
होतकरू दिव्यांग विद्यार्थ्यांना पुस्तके व शैक्षणिक साहित्य वाटप
दिव्यांग शाळा — शैक्षणिक साहित्य वाटप सोहळा
विद्यार्थी — साहित्य वाटप
दिव्यांग विद्यार्थी — पुस्तक वाटप
शैक्षणिक साहित्य वाटप समारंभ
🏫
ज्ञानज्योती आदर्श विद्यामंदिर, नळदुर्ग आनंदघर हॅपी होम - नळदुर्ग शहर व परिसरातील सर्व पालकांना नम्र आवाहन, आपल्या पाल्यांना सुसंस्कृत, स्वावलंबी, आत्मविश्वासू आणि जीवनमूल्यांनी समृद्ध घडविण्यासाठी यावर्षीपासून आनंदघर हॅपी होम येथे प्रवेश घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे. लहान मुलांना हसत-खेळत दिलेले शिक्षण त्यांच्या मनावर कायमस्वरूपी ठसा उमटवते. मातृभाषेतून शिकल्यामुळे मुले विषय सहज समजून घेतात आणि आत्मसात करतात. अनुभवातून मिळालेले शिक्षण कधीही विसरले जात नाही. त्यामुळे आमच्या शाळेत मुलांच्या सर्वांगीण विकासावर विशेष भर दिला जातो. यापूर्वी आमच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण घेतलेली अनेक मुले आज विविध क्षेत्रांत यशस्वीपणे पुढे जात आहेत. आमचे ध्येय केवळ परीक्षा उत्तीर्ण होणारी मुले तयार करणे नसून, चांगले नागरिक आणि सुसंस्कारित व्यक्तिमत्त्व घडविणे आहे. आम्ही माफक शुल्कात दर्जेदार शिक्षण देण्यास कटिबद्ध आहोत. भरमसाठ फी म्हणजेच उत्तम शिक्षण असे नसते. परवडणाऱ्या शुल्कामध्येही गुणवत्तापूर्ण शिक्षण आणि संस्कार देता येतात, यावर आमचा ठाम विश्वास आहे. "साधी राहणी, उच्च विचारसरणी" हेच आमच्या संस्थेचे ब्रीद आहे. दारात गाडी, टाय-बूट आणि आकर्षक इमारत म्हणजेच उच्च शिक्षण नव्हे; तर मुलांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास हेच खरे शिक्षण आहे. एकदाच प्रवेश घ्या आणि शाळा बदलण्याची गरज न पडता दहावीपर्यंतचे शिक्षण एकाच ठिकाणी पूर्ण करा. आनंदघर हॅपी होमची वाटचाल लहान मुलांना आनंददायी, अनुभवाधारित आणि खेळातून शिक्षण मिळावे या उद्देशाने पुणे येथील ग्राममंगल संस्थेच्या मार्गदर्शनाखाली तसेच शिक्षणतज्ज्ञ प्रा. रमेश पानसे यांच्या विचारातून "आनंदघर" या उपक्रमाची संकल्पना साकारण्यात आली. या उपक्रमाचे उद्घाटन प्रा. रमेश पानसे यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच पायाभरणीचा शुभारंभ कु. मधुरा जाधव व तलाठी श्री. अशोक मोकाशी यांच्या शुभहस्ते संपन्न झाला. सन २०१४ ते २०१७ या कालावधीत विद्यार्थ्यांना मोफत प्रवास, शालेय साहित्य, खेळणी व गणवेश उपलब्ध करून देण्यात आले. "एक मूल – एक वृक्ष" या उपक्रमांतर्गत ३२ विद्यार्थ्यांनी शाळा परिसरात ३२ वृक्षांची लागवड केली. शालेय परवानगी मिळेपर्यंत विविध शैक्षणिक व सामाजिक उपक्रम सातत्याने राबविण्यात आले. शेतकरी, एकल महिला आणि समाजातील गरजू घटकांना मार्गदर्शन व मदत उपलब्ध करून देण्यात आली. तसेच विविध आरोग्य शिबिरांमध्ये सक्रिय सहभाग नोंदविण्यात आला.
आनंदघर — भूमिपूजन
आनंदघर — भूमिपूजन
आनंदघर — बांधकाम
आनंदघर शाळा
🙏
कैलासवासी मथुराबाई तात्याबा जाधव यांच्या स्मरणार्थ स्थापन करण्यात आलेल्या संस्थेने त्यांच्या स्मृती जतन करण्यासाठी संस्थेच्या जागेच्या मध्यभागी त्यांची मूर्ती उभारण्याचा निर्णय घेतला. त्यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त दिनांक २८ नोव्हेंबर २०२३ रोजी विशेष स्मृतिसोहळ्याचे आयोजन करण्यात आले. या निमित्ताने संस्थेने एक सामाजिक उपक्रम सुरू केला आहे. ज्या कुटुंबात कन्यारत्नाचा जन्म होईल, त्या नवजात बालिकेच्या नावाने ₹२,७०० रक्कम बँकेत जमा करण्यात येईल, जेणेकरून ती रक्कम बालिकेला तिच्या अठराव्या वर्षी प्राप्त होईल. या उपक्रमाची नोंद उपजिल्हा रुग्णालय नळदुर्ग येथे करण्यात आली आहे. तसेच, नवजात बालिकेच्या आईला साडी-चोळी भेट देऊन आणि वडिलांचा यथोचित सत्कार व अभिनंदन करून त्यांना संस्थेत सन्मानित करण्यात येणार आहे. गुणवंत युवा सन्मान पुरस्कार याच दिवशी, म्हणजे दरवर्षी २८ नोव्हेंबर रोजी, समाजातील अत्यंत हुशार, वेगळेपण जपणाऱ्या, गरिबीवर मात करून यश संपादन करणाऱ्या तसेच दुर्लक्षित राहिलेल्या एखाद्या तरुण किंवा तरुणीचा सन्मान करण्याचा उपक्रमही संस्थेने सुरू केला आहे. या पुरस्कारांतर्गत ₹५,००१ रोख रक्कम, सन्मानचिन्ह आणि सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात येतो. या पुरस्काराचा प्रथम मान ज्येष्ठ लेखक देविदास सौदागर यांना प्रदान करण्यात आला. त्यांच्या सत्काराने या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
मूर्ती पूजन, हार अर्पण व दुग्धाभिषेक — दि. २८-११-२०२३ | नळदुर्ग
अभिषेक — दुग्धाभिषेक सोहळा
🧓
समाजातील ज्येष्ठ नागरिकांना सन्मानपूर्वक सेवा, आधार व आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने “अंतरंग वृद्ध सेवा केंद्र” उभारण्याचा निर्णय संस्थेने घेतला. या हेतूने ३३ फूट बाय ३३ फूट आकाराचे बांधकाम सुरू करण्यात आले. संस्थेच्या प्रयत्नांतून हे बांधकाम अवघ्या सहा महिन्यांत पूर्ण करण्यात आले. या केंद्राच्या माध्यमातून वृद्धांना सुरक्षित, सन्मानजनक व सेवाभावी वातावरण उपलब्ध करून देण्याचा संस्थेचा मानस आहे. सन २००८ पासून संस्थेने समाजोपयोगी उपक्रम राबविताना ज्येष्ठ नागरिकांच्या कल्याणाला विशेष प्राधान्य दिले असून, वृद्ध सेवा केंद्र हे त्याच सामाजिक बांधिलकीचे एक महत्त्वपूर्ण पाऊल आहे.सेवानिवृत्त ज्येष्ठ नागरिकांना आयुष्यभर कुटुंबासाठी जगल्यानंतर स्वतःसाठी जगणे हे कधीच लक्षात येत नाही. राहत्या घरात पूर्वीसारखे मनानुसार, वेळेच्या वेळी सर्व काही मिळत होते; पण हा प्रश्न प्रत्येक सेवानिवृत्ताला भेडसावतो. घरात पेन्शन खर्चासाठी असूनही मिळणारी वागणूक म्हणजे कारागृहातील कैद्याप्रमाणे असते. या गोष्टीवर विचारांती एक कल्पना सुचली, ती अशी – "दुसरे घर". होय, दुसरे घर! अगदी पूर्वीसारखेच मनाप्रमाणे, कदाचित त्याहूनही आनंदाने उरलेले आयुष्य जगता यावे असे ठिकाण. "बांधा व वापरा, हस्तांतरण करा" हे शासनाचे धोरण राबविले जाते. अगदी तसे नाही, पण थोडे वेगळे. आमची संस्था "मथुरा प्रतिष्ठान" या संस्थेची पाच एकर जमीन आहे. अगदी हायवेपासून दोन मिनिटांच्या अंतरावर, जवळच उपजिल्हा रुग्णालय, हवेशीर व रम्य ठिकाण, सोबतीला फळबाग, पक्ष्यांचा किलबिलाट, प्रदूषणमुक्त वातावरण आणि मुबलक ओझोन वायू. संस्था ज्येष्ठ नागरिकांना 20 × 20 ची जागा मोफत देणार आहे. बांधा आणि आयुष्यभर रहा. तुम्हाला दोन वेळचा चहा, कॉफी, दूध, जे हवे ते; नाश्ता, दोन वेळचे जेवण, आवडीचे खेळ, व्यायामाचे साहित्य उपलब्ध करून देणार आहोत. आणखी काय हवे? याशिवायही जे काही हवे असेल ते आम्ही देण्याचे वचन देतो. मात्र त्याचे शुल्क वेगळे द्यावे लागेल – "Paid on Demand". बांधून राहायचे नसेल तरी येथे सशुल्क सेवा तत्परतेने मिळणार, यात शंका नसावी.